श्रीरामपूर [ प्रतिनिधी ] -
वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन [डब्ल्यूल्यूसीपीए ] द्वारा दिला जाणारा मानाचा "वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड -२०२० " देऊन सन्मानीत करण्यात आले.
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव परिसरातील प्रा. लेविन भोसले यांनी सामाजिक शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत उच्चशिक्षित बनविले आहे तसेच साहित्य क्षेत्रातून विविध पुरस्कार मिळविले आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन जागतिक संविधान व संसदीय संघ यांनी दखल घेऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव ढवळे, प्रांताधिकारी श्री. अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, महाराष्ट्र संपादक परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष श्री प्रकाश कुलथे, डब्ल्यूल्यूसीपीएच्या महाराष्ट्र राज्य श्रीरामपूर चॅप्टर अध्यक्ष डॉ दत्ता विघावे, कोषाध्यक्ष शैलेंद्र भणगे, प्रा.डॉ. म्हस्के, प्रा. आदिनाथ जोशी आदी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी निमंत्रीत लोकच सहभागी होते.

