shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेखा जरेंच्या खुनाचा ‘मास्टरमाईंड’ बाळ ज. बोठे फरार..!!

पत्रकार बोठेंच्या अटकेसाठी पोलिसांचे पोलीस पथक तैनात करून प्रयत्न -पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती..!!

अहमदनगर : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याप्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी कडून तपास करताना मुख्य सूत्रधाराची माहिती पोलिसांच्या हाती मिळाली आहे.

                    बाळ ज. बोठे

अहमदनगरचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोटे  व सागर भिंगारदिवे यांनी या हत्याचा कट रचला असून त्यांनीच अटक केलेल्या आरोपींना रेखा जरे यांची सुपारी दिली होती. तर या खुनाचा मुख्य आरोपी बाळ ज. बोटे यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून पाच पथके रवाना झाली आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
                           रेखा जरे

कार्यकर्त्या आणि यशस्विनी महिला ब्रिग्रेडच्या अध्यक्ष रेखा जरे हत्याप्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपी कडून तपास करताना मुख्य सूत्रधाराची माहिती पोलिसांच्या हाती मिळाली आहे.

अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार बाळ  बोटे यांनी या हत्याचा कट रचला असून त्यांनीच अटक केलेल्या पाच आरोपींना रेखा जरे यांची सुपारी दिली होती.
या घटनेचा मुख्य आरोपी बाळ ज. बोटे यांना अटक करण्यासाठी पोलिसांकडून पाच पथके रवाना झाली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दि. 30 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी पुण्याहून अहमदनगर येत असताना जतेगाव घाटात त्यांच्या गाडीला कट मारला म्हणून दुचाकी स्वार आणि रेखा जरे यांच्यात आरडाओरड सह बाचाबाची झाली.दोन्ही आरोपीं दारूडे असल्याने त्यांना रेखा जरे यांची गाडी शोधणे कठीण झाल्याचे समजते. यामुळे आरोपीने प्रथम गाडीचा फोटो मुख्य सूत्रधारला पाठवला त्या पासून त्यांना खाञी पटल्यानंतर  त्या आरोपीने गाडीत डोकावले त्यात तीन महिला आढळल्या.यापैकी रेखा जरे ह्या कोण असा सूत्रधाराला प्रश्न पडला. त्यानंतर मोबाईल वर फोटो पाहील्यावर व खाञी पटल्याने आरोपीने जरे यांचे जोरात केस पकडून अतिशय निर्दयपणे त्यांच्या गळयावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. त्यामुळे गाडीत बसलेली महिला आणि जरे यांचा मुलगाही भयभीत झाले.जरेंच्या सोबत असलेल्या महिलेने जरे यांना दुसऱ्या सीटवर बसवले आणि 100 ते 110 च्या गतीने गाडी चालवत टोलनाक्यावर ती गाडी आणली.

त्या ठिकाणाहून  रुग्णवाहिकेने त्यांना शासकीय रुग्णालयात आणले परंतू रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांची प्राणज्योत माळवल्याचे निष्पण्ण झाले. यानंतर बाळ ज. बोठे यांनी शासकीय रूग्णालय ते जरे यांचे अंत्यसंस्कार होईपर्यंत त्यांच्या कुटुंबियांची पाठराखण केल्याचे समजते. यावेळी पोलीस यंञणेचे बाळ.ज.बोठे यांच्या प्रत्येक कृतीकडे बारकाईने लक्ष होते.

सागर उत्तम भिंगारदिवे वय 31 वर्ष रा.शास्ञीनगर ; केडगाव अहमदनगर  व बाळ ज. बोठे या दोघांनी रेखा जरे यांच्या खुनाची सुपारी दिल्याचे आरोपींनी सांगितले आहे.
close