shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.अतुल वनवे यांच्या कृष्णा हॉस्पिटल ची यशस्वी यशोगाथा..अनिल पवार..!!

इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)
कोणत्याही पार्श्वभूमी शिवाय काही माणसं अभूतपूर्व यश संपादन करतात . काही ध्येयनिष्ठा प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी जपत यशस्वी होतात. 



अशाच व्यक्तीमत्वा पैकी एक यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर चे इंदापूर मुख्य डॉक्टर अतुल कारभारी वनवे. डॉक्टर अतुल वनवे हे लाकडी गावचे कारभारी वनवे सर यांचे चिरंजीव, ज्यांना या गावातील व वनवे कुटुंबातील सर्व क्षेत्रातील लोक सर्व प्रकारची कार्य हे सरांना विचारून करीत. त्यामुळे त्यांचे नाव कारभारी होते. 

७२ च्या दुष्काळात रस्त्यावर दगड माती उचलून काम करून शिकलेले कारभारी सर बारामती मधील कृषी कॉलेजमध्ये जुनी अकरावी दुसऱ्या क्रमांकाने पास झाले होते. पुढे एक वर्ष इंजीनियरिंग पूर्ण केली परंतु पैशाअभावी सदर शिक्षण सोडून बी एससी पूर्ण केली. त्यानंतर माध्यमिक शाळेचे शिक्षक झाले. 

असे असताना. आध्यात्मिक संस्कार असणारे कारभारी वनवे हे वनवे कुटुंबाची जबाबदारी व गोरगरीब जनतेची अडचणीची कामे पार पाडीत. शिक्षक पेशा सांभाळत असताना ,त्यांची पत्नी सौभाग्यवती मालन कारभारी वनवे यांच्या साथीने वनवे परिवाराला अध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक असा आदर्श देण्याचे कार्य त्यांनी केले. 

याच काळात हरिभक्त परायण कोकाटे महाराज यांच्याही आशीर्वाद त्यांच्या पाठीशी मिळाला. असे असताना डॉक्टर अतुल वनवे हे पुत्ररत्न झाले. डॉक्टर वनवे यांचे शिक्षण प्राथमिक शाळेत लाकडी येथे झाले, माध्यमिक शिक्षण डाळज नंबर २, उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या मामाच्या गावाकडे देवापुर तालुका मान या ठिकाणी झाले.  आई-वडिलांची इच्छा होती की ,माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. त्यांच्या या शब्दाला जागून डॉक्टर अतुल वनवे यांनी एम .बी. बी. एस पदवीला शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवून घेतला. ही पदवी कोल्हापूर येथे पूर्ण केली. 

त्यानंतर आर्थोपेडिक तज्ञ ( D-ORTH) नाशिक येथे केले .यानंतर अनुभव घेण्यासाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे येथे एक वर्ष पूर्ण केले. त्यानंतर लाईफ लाईन चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटल वापी सुरत गुजरात या ठिकाणी दोन वर्ष प्रॅक्टिस पूर्ण केली. पुढे महाराष्ट्रात परत येऊन ग्रामीण भागाची इतंभूत माहिती असल्याने व गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी ग्रामीण भागात सेवा देण्याचा निर्णय घेतला. परंतु स्वतःची हॉस्पिटल सुरू करण्यासाठी खूप मोठा पैसा लागत होता म्हणून सुरुवातीला श्रीगोंदा याठिकाणी प्रॅक्टीस चालू केले .१ जानेवारी २०१२ ला इंदापूर या ठिकाणी "ज्या मातीत जन्म झाला त्या मातीला आपण काय तरी देणे लागतो". म्हणून स्वतःच्या तालुका असलेल्या इंदापूर याठिकाणी भाडेतत्त्वावर स्वतःचे हॉस्पिटल चालू केले .त्यामध्ये त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रतिभा अतुल वनवे स्त्री रोग तज्ञ यांनीही मोलाचा साथ दिली. व त्यांनी त्या ठिकाणी प्रॅक्टीस चालू केली .पण जागेअभावी पेशंटचे होणारी अडचण असताना नागरिकांच्या असणाऱ्या दवाखान्या वरच्या विश्वासामुळे अडचणीच्या ठिकाणीही लोकांनी मोलाची साथ दिली.

ग्रामीण भागातील जनतेची अस्थिरोग तज्ञ म्हणून व स्त्रीरोग तज्ञ म्हणून डॉक्टर यांनी सेवा केली. परंतु आपली स्वतःची जागा असावी त्या ठिकाणी स्वतःची हॉस्पिटल असावे म्हणजे अपघात पेशंट किंवा गरोदर महिला पेशंटला अडचण होणार नाही. 

असे त्यांचे वडील कारभारी वनवे हे नेहमी म्हणत असंच म्हणून त्यांच्या आशीर्वादाने व त्यांच्या हातून नवीन जागेचे भूमिपूजन झाले व ते स्वतः रात्र दिवस  लक्ष घालून हॉस्पिटल ची उभारणे केली. १ डिसेंबर २०१७ रोजी नवीन हॉस्पिटल मध्ये गृहप्रवेश केला. यावेळी सदर हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन केले. 

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि गुरुवर्य ह. भ .प .कोकाटे महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने हे हॉस्पिटल चालू करण्यात आले. जुन्या हॉस्पिटलमध्ये येत असलेल्या अडचणी माहित असल्याने त्या पुन्हा पेशंटला होऊ नये याची पूर्ण काळजी बांधकाम करताना घेण्यात आली .त्यामुळे पूर्ण सुविधायुक्त व स्वच्छ  सुंदर हॉस्पिटल चालू केले. आज या दोन तीन वर्ष अनेक प्रकारची मोडलेली हाडांची किचकट ऑपरेशन ,मणक्याची ऑपरेशन, कृत्रिम सांधेरोपण, शस्त्रक्रिया, लहान मुलांच्या हाडांची ऑपरेशन, अशी ७५० ऑपरेशन सर्व गोरगरीब पेशंट व ग्रामीण भागातील पेशंटची जाण ठेवून केली. तसेच गरोदरपणातील शस्त्रक्रिया, बाळंतपण किचकट पोटाची ऑपरेशन ,डॉक्टर प्रतिभा वणवे यांनी ४५० ते ५०० ऑपरेशन केली. डॉक्टर गणेत राख यांचा आदर्श ठेवून "बेटी बचाव बेटी पढाव अभियान" सुरू केले .

यामध्ये जन्माला आलेल्या दोन नंबरच्या मुलीच्या बाळपणी निम्मा खर्च हॉस्पिटलच्या वतीने माफ केला जातो. तसेच तिसरी मुलगी झाली. तर त्या मुलीसाठी दहावी पर्यंतचे शिक्षण यासाठी मदत केली जाते .आता हॉस्पिटलमध्ये सुसज्ज दोन ऑपरेशन थेटर आहेत. 2cr मशीन, सोनोग्राफी मशीन, संपूर्ण उपकरण उपयुक्त हॉस्पिटल चालू आहे . हे सर्व काम करत असताना गोरगरीब पेशंट व सर्व पेशंट केंद्रबिंदू समजून त्यांना त्यांच्या योग्य दरात सेवा देण्याचे काम करीत आहेत. याबरोबर या कोरोनाजन्य चालू परिस्थितीत डॉक्टर वनवे यांनी सामाजिक जाणीव ठेवून अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू देण्याचे कार्यही त्यांनी करून दाखवले आहे .तसेच अनाथ आश्रम माई या संस्थेला नेहमी  ते मदत करतात.

या संस्थेचे ते एक सदस्य म्हणून सध्या ते आहेत तसेच मुख्यमंत्री फंड ,प्रधानमंत्री फंड यांनाही ते वेळोवेळी मदत करतात .त्याच बरोबर त्यांचे सामाजिक अध्यात्मिक व कोणाला ही कमी न लेखता बरोबर घेऊन मनमिळावू स्वभाव तून ते आपले मित्र त्व ही संभाळून आहेत. त्यांचा हा आपुलकीचा स्वभाव हा नवीन युवकांना एक आदर्श ठरणारा आहे त्यांच्या या कार्यात त्यांच्या सुविद्य सौभाग्यवती डॉक्टर प्रतिभा वनवे तसेच त्यांची आई ,भाऊ आणि वनवे परिवार यांची आपुलकीने साथ त्यांच्या तनामनात असल्याचे दिसून आले. अशा आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या कृष्णा हॉस्पिटल याची यशोगाथा म्हणजे गोरगरीब जनतेची सेवा होय.
close