इंदापूर प्रतिनिधी:३/१२/२०.
केंद्र शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेले तीन कृषी विषयक कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शनं व आंदोलने करत आहेत, या संदर्भात दिल्लीच्या सिमेवर शेतकऱ्यांनी फार मोठे आंदोलन उभे केलेले आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून इंदापूर येथे काँग्रेस पक्षाने पुणे जिल्हा अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शना खाली व तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत यांच्या नेतृत्वात तहशील कचेरी आवारात आंदोलन केले. तसेच या बिलला विरोध दर्शवत लेखी निवेदनही तहसील प्रतिनिधी याना आज गुरुवार (दी.३)रोजी देण्यात आले .
या वेळी तालुका अध्यक्ष स्वप्नील सावंत सहित झाकीर काझी, निवास शेळके, प्रदीप शिंदे, चमनभाई बागवान, भगवान पासगे, राहुल आचरे, संतोष अरडे,संतोष शेंडे, तुषार चिंचकर,राहुल जाधव,श्रीनिवास पाटील,विपुल भिलारे,गोविंद खटकदौंड, अतुल जाधव, सुफियानखान जमादार, मिलिंद साबळे , नइम शेख , आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्तिथ होते

