shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशांतमामा उंबरे मित्र परिवाराच्या वतीने अंकिता पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त वृक्षारोपण..!!

इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतना निमित्त प्रशांतमामा उंबरे मित्र परिवाराच्या वतीने जुन्या कचरा डेपो (डम्पिंग ग्राउंड) व स्मशानभूमी  शेजारील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. अंकिता पाटील यांच्या हस्ते वृक्षरोपण यावेळी करण्यात आले.
   

अंकिता पाटील यांनी आपला अभिष्टचिंतन कोरोना पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनात प्रशांतमामा उंबरे मित्रपरिवाराने  प्रतिसाद देत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला.
   

प्रशांतमामा उंबरे युवामंच मधील सर्व सदस्य हे तरुण आहेत व हे सर्व युवक विविध ठिकाणी नोकरी करतात व काही तरुण व्यावसायिक आहेत. विविध माध्यमातून ते सामाजिक उपक्रम राबवत असतात. वृक्षारोपणाचा उपक्रम विधायक असून निसर्ग संवर्धनासाठी अशा उपक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे मत यावेळी अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.
    

यावेळी प्रशांतमामा उंबरे, महेश कोकाटे, अक्षय सूर्यवंशी, भैया परदेशी, अजिंक्य जावीर, आनंद मखरे, प्रसाद जोशी, निखिल वाघमोडे उपस्थित होते.
close