shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांच्याकडून चाँदशाहवली (रह) बाबांना फुलांची चादर अर्पण..!!

 इंदापुर:प्रतिनिधी दि.२५ डिसेंबर २०२०.
माजी मंत्री व भाजप नेते  हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवार दिनांक २४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता इंदापूर येथील ह. चाँदशाहवली (रह) उरूसानिमित्त चाँदशाहवली बाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन फुलांची चादर अर्पण केली.
   

दि .२३ते २५ डिसेंबर २०२० रोजी तीन दिवस चालणाऱ्या उत्सवामध्ये जियारत या धार्मीक विधीच्या वेळी हर्षवर्धन पाटील उपस्थित राहून चाँदशाहवली बाबांच्या समाधीस फुलांची चादर अर्पण केली.
  हर्षवर्धन पाटील,' ह. चाँदशाहवली बाबाच्या पवित्र ठिकाणी आल्यानंतर मनःशांती आणि सकात्मक उर्जा नेहमीच मिळते. हे ठिकाण हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असून भाईचारा जपण्याचा अनमोल संदेश समाजास मिळतो.
    

यावेळी नगरसेवक भरत शहा, नगरसेवक कैलास कदम,भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, जावेद शेख, गोरख शिंदे, ललैद्र शिंदे, इब्राहीम बाबा, शेरखान पठाण, मच्छीद्र शेटे, उरूस कमीटीचे आझाद पठाण, महादेव चव्हाण, हमीदभाई आतार, मुनीर मुजावर, महामुद मुजावर  उपस्थित होते.
close