shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कै. विठोबा (तात्या) भरणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

कै.विठोबा(तात्या) भरणे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार.

इंदापूर प्रतिनिधी:
इंदापूर:महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा (तात्या )  रामा भरणे यांचे  वयाच्या 92  व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे हजारोंच्या उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले.
 काही दिवसापासून  आजारी असल्यामुळे त्यांना पुणे येथे ठेवण्यात आले होते. त्यांचा  उपचारादरम्यान मंगळवारी रात्री   त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले व तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे


 
अंत्यविधीस माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल,करमाळाचे  आमदार संजय शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर, दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवानेते राजवर्धन पाटील यांच्यासह हजारो जनसमुदाय उपस्थित होता.
close