हाफचड्डी ग्रुप ने दिल्या मिञाला शुभेच्छा..
वडाळा महादेव: प्रथितयश फुले हाॅटेलचालक संचालक व व्यावसायिक जयसिंग पवार उर्फ चेतन पवार यांचा 50 वा सुवर्ण महोत्सव वाढदिवस अगदी मोजक्या लोकांच्या व हाफचड्डी वर्गमिञाच्या सहवासात अगदी थाटामाटात पवार वस्तीवर संपन्न झाला.
चेतन पवार यांचा एका शेतकरी कुटूंबात जन्म झाला. शिक्षण जेमतेम झाले.परंतु मिञमंडळी मध्ये एक संयमी व कुणाशीही भांडण व वैर नसलेले व सदोदित हसतमुख चेहरा असणारे एक इमानदार व्यक्तिमत्व म्हणून प्रसिध्द असलेल्या चेतन पवारांना जीवनात अनेक चढ उतारांचे खडतर प्रवास व मेहनत करून आज प्रथितयश हाॅटेल व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविलेआहे.अशा या व्यक्तिमत्वाचा ५० वा सुवर्ण महोत्सव वाढदिवस हाफचड्डी ग्रुप च्या सहवासात थाटामाटात संपन्न झाला.
यावेळी हाफचड्डी वर्गमिञ ग्रुप म्हणजे चेतन पवार यांचा पहिली ते दहावी पर्यंतचे वर्गमिञ. या मिञ मंडळीच्या (हाफचड्डी) ग्रुपच्या वतीने शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश सखाराम जेठे व मुख्याध्यापक शिवाजी भालेराव सर यांनी मनोगत व्यक्त करून चेतन पवार यांना हार्दिक अभिनंदन करून भावीवाटचालीस मनपुर्वक शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे हाफचड्डी ग्रुप च्या वतीने गुलाब पुष्प व छञपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन यावेळी त्यांचा सन्मानपुर्वक सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवाजी भालेराव, राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे संस्थापक अध्यक्ष रफीक भैया शेख, सुनिल जोर्वेकर.;अनिल फोफसे, राजेंद्र पवार, सुरेश पवार, बाळासाहेब पवार, तलाठीभाऊसाहेब राजेश घोरपडे;राजेंद्र भाकरे, माझी सरपंच किशोर जेठे; ज्ञानेश्वर(बंडू )पवार,बंडू जोशीं;बाळू सिरसाठ;शरद लांडगे, माधव मुठे, शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे आदी मिञमंडळी व गावातील आप्तेष्ठ, नातेवाईक आवर्जून उपस्थित होते.
तसेच सातारा येथील व्यावसायिक मुकुंद जगधने; जुन्नर येथील विघ्नहर कारखान्यात अधिकारी असलेले प्रकाश पवार (PD);नादी विरगाव येथील माझी सरपंच भाऊसाहेब घोडके यांनी आपल्या लाडक्या मिञाला भ्रमणदूरध्नी वर अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

