शिवछावा मावळा संघटनेचे संस्थापक सुजित करळे यांचे अभिष्टचिंतन सामाजिक उपक्रमातून संपन्न.. शशिकांत जाधव..!!
पारोळा, जळगाव, बुलढाणा याठिकाणी गरजूंना विविध साहित्य व रुग्णांना फळे वाटप.
इंदापूर प्रतिनिधी: तात्याराम पवार
शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सुजित करळे यांच्या अभिष्टचिंतन यानिमित्त महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या हस्ते विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला.
गरजूंना ब्लँकेट वाटप करताना संघटनेचे पदाधिकारी
उस्मानाबाद जिल्हा परंडा तालुक्यातील नालगाव याठिकाणच्या विनायक शिवाजी करळे व कुमुदिनी विनायक करळे
यांचे सुपुत्र सुजित करळे यांचा जन्म २८ डिसेंबर१९८७ रोजी झाला असून त्यांचे वडील बावडा तालुका इंदापूर याठिकाणी शिवाजी विद्यालय बावडा येथे शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना त्या ठिकाणी रहिवासी झाले.
त्यांचे शिक्षण बावडा येथे झाले असून त्यांनी मेडिकल क्षेत्रातील शिक्षण घेऊन व्यवसाय करीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेने महाराष्ट्रातील तमाम युवकांना संघटित करून सामाजिक क्षेत्रात रयतेच्या सेवेसाठी त्यांनी शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्रात स्थापन केली. सर्वधर्मसमभाव जपत महाराष्ट्रात त्यांनी शिवछावा मावळा संघटनेचे मावळे उभा केले. त्यांच्या या विचाराला साथ देत त्यांच्या अभिष्टचिंतन दिवशी
संघटनेच्या पदाधिकारी यांच्याद्वारे तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे गरजू लोकांना चादर ब्लॅंकेट वाटप करण्यात आले .तसेच सिव्हिल हॉस्पिटल पारोळा येथे फळवाटप करण्यात आले. यावेळी खान्देश अध्यक्ष ईश्वर पाटील, जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील, उपजिल्हाध्यक्ष सुनील पाटील, तालुका अध्यक्ष अतुल शिंपी व शिवछावा मावळा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच बुलढाणा जिल्हा या ठिकाणी शिवछावा मावळा संघटनेचे महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना बावस्कर यांनी नादुरा याठिकाणी गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटप केले. तसेच पुणे या ठिकाणी संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्या माध्यमातूनअन्नदान व सुजित करळे यांच्या हस्ते केक कापून अभिष्टचिंतन साजरा करण्यात आला. अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष शशिकांत जाधव यांनी दिली. ते पुढे म्हणाले की सुजित करळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या कृपा छायेतून सामाजिक जाणीव ठेवत काम करीत आहेत. महाराष्ट्रात ते आपले सामाजिक कार्य करीत. एकजुटीने मावळे जोडण्याचे कार्य ते करीत आहे. त्यांना त्यांच्या अभिष्टचिंतनाच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

