shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुरवड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका म्होपरकर..!!

इंदापूर प्रतिनिधी:- दि.१२ डिसें.२०.सुरवड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रियांका राहुल म्होपरकर यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी मंत्री व भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथील भाग्यश्री बंगलो येथे आज  सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनीही नूतन उपसरपंच प्रियांका म्होपरकर यांना शुभेच्छा दिल्या. 
              

हर्षवर्धन पाटील यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, लोकहितासाठी विविध योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा. कुठलेही काम करीत असताना सकारात्मक विचार ठेवल्यास कोणतेही काम चांगले होते.
         

याप्रसंगी सुरेश मेहेर, दादासाहेब घोगरे, बाळासाहेब घोगरे, रामदास कोरटकर, ब्रह्मदेव कोरटकर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
close