shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आधार फाउंडेशन तर्फे शिंदे कुटुंबाला मदतीचा आधार...!!


संगमनेर । प्रतिनिधी( ऋषिकेश जगताप):
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे प्रभाकर शिंदे यांच्या घरात झालेल्या शॉर्टसर्किट मुळे घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते त्यातूनच पई पई करून साठवलेले पैसे ही या आगीतून सुटले नाही.

या धक्क्याने शिंदे कुटुंब उघड्यावर आले होते. मात्र गोरगरीब मुलांना व अनाथ मुलांना मायेचा आधार देणारे आधार फाउंडेशन तर्फे जळीत ग्रस्त शिंदे कुटुंबांना मदतीचा आधार देण्यात आला . यावेळेस मदतीचे साहित्य पाहून शिंदे कुटुंबीय आपले अश्रू थांबवू शकले नाही. चार दिवसांपूर्वी शॉर्टसर्किट ने घर जळाले होते. तर माध्यमांनी दानशूरांना मदतीसाठी आव्हाहन केले होते.

 तर याची दखल संगमनेर येथील आधार फाउंडेशन ने घेतली व प्रेमाने मदतीचा निर्णय घेतला. बुधवार  दिनांक ३०/१२/२०२० रोजी सायंकाळी ५ वा. आधार फाउंडेशन चे समन्वयक डॉ. महादेव अरगडे , स्वामी समर्थ फर्निचर चे मालक , वाल्मीक चौधरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके आदि घारगाव येथे येऊन शिंदे कुटुंबीयांना ही मदत केली.त्यामुळे आधार फौडेशनच्या सामाजिक कामाचे परिसरात कौतुक होत आहे.
close