शनिशिंगणापूर येथील भक्तांकडून आकर्षक विद्युत रोषणाई!
सावळीविहीर( प्रतिनिधी):
शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर व परिसरात कर्नाटक येथील नगरविकास मंत्री ना.बी.ए.बसवराज यांच्या देणगीतून आकर्षक अशी विद्युत फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही आकर्षक अशी फुलांची सजावट पाहून साईभक्त ही आकर्षित होत आहेत.
दरवर्षी 31 डिसेंबर व 1 जानेवारीला सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची गर्दी होत असते. तसेच श्री साईबाबांच्या दर्शनाने नवीन वर्षाचे स्वागत व्हावे.अशी सर्व साईभक्तांची इच्छा असते.शिर्डीत नवीन वर्षाचे स्वागत जोरदार करण्यात येते. त्यामुळेच शिर्डी मध्ये श्री साईबाबांचे मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते.यावर्षीही कर्नाटकातील साईभक्त व कर्नाटकचे राज्याचे नगरविकास मंत्री यांच्या देणगीतून येथे आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
आज शिर्डीत साई भक्त दर्शनासाठी येत आहेत. या सर्व साईभक्तांचे दर्शनाबरोबरच आकर्षक फुलांची सजावट लक्ष वेधून घेत आहे. तसेच शनिशिंगणापूर येथील गणेश शेेटे शनेश्वर डेकोरेटर यांच्या देणगीतून श्री साईबाबांच्या मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी ही आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्षही आकर्षित करीत आहे. सध्या शिर्डी व श्री साई मंदिर व परिसरात श्री साई नामाचा जय घोष सुरु आहे. कोरोना संदर्भातल्या अटी व शर्ती राखत साईभक्त येथे साईनामाचा जयघोष करीत श्री साईबाबांचे दर्शन घेत आहेत.
श्री साईबाबांच्या मंदिराच्या सुवर्ण कळसाचे दर्शन घेत आहेत. येणारे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे, समृद्धीचे जावो, तसेच कोरोनाचा नायनाट होऊ दे!अशी अनेक साईभक्त श्री साईबाबांच्या चरणी मनोमन साकडे घालत आहेत. साईभक्तांच्या सुविधेसाठी साईबाबा संस्थान प्रशासन यांनी जय्यत तयारी केली असून साईभक्तांचे सुलभ व व्यवस्थित दर्शन होत आहे. आज 31 डिसेंबर गुरुवार रोजी रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. त्यामुळे अनेक साईभक्त रात्री ही दर्शन घेणार आहेत.त्यामुळे साईभक्तामधून समाधान व्यक्त होत आहे.
आज गुरुवार व 31 डिसेंबर असल्याने तसेच आज गुरुपुष्यामृत योग असल्याने शिर्डी शहरात नववर्षाच्या पूर्वसंध्येला आणि नववर्षाच्या स्वागताला होणारी भाविकांची गर्दी होत असुन साई भक्तांची शिर्डीत होणारी गर्दी लक्षात घेता पोलिस प्रशासनाने,नगरपंचायत व साईबाबा संस्थान ने भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व प्रकारची व्यवस्था चोख ठेवली आहे.त्यातच साईबाबा संस्थान अनोख्या पद्धतीने साई भक्तांच स्वागत करत आहे. ते पाहून शिर्डीत दर्शनाला येणाऱ्या भाविक बाबांच्या दर्शनाची आस असताना नक्कीच या अनोख्या स्वागताने सुखावला असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे.
परराज्यातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना यापूर्वी पोलिस तपासाला सामोरे जावे लागत होते.त्यामुळे पोलिस पाहिले की अंगावर काटा येत होता.परंतु साईबाबा संस्थान ने शिर्डीत स्वागत नावाचे स्टिकर येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या वाहनाला चिटकवून वाहनाचार नंबर आणि किती जण आहेत याची नोंद घेऊन त्यांना हात जोडून शिर्डीत आपले स्वागत आहे .असे म्हणत त्याचें स्वागत केलेले पाहून भाविक सुद्धा या अनपेक्षित स्वागताचे भारावून जात आहे व साईबाबा संस्थान चे आभार मानत आहे.

