नगर। प्रतिनिधी (शिवा म्हस्के):
नगर तालुक्यातील दहिगाव येथे सालाबादप्रमाणे यंदाही दत्तजयंती उत्सव निमित्ताने गावातील तरुण एकत्रितपणे येऊन हात झाडु घेऊन गावा स्वच्छ केले जाते. दत्तजयंती चे काल्याचे किर्तीन ह.भ.प आन्हाड महाराज यांच्या मधुर अशा वाणीतुन सर्व भाविक भक्त मनापासून ऐकंत होते.
भगवान दत्तात्रय यांचा जन्म ब्राह्म,विष्णु ,महेश या तिन्ही देवताचा एकत्रीकरण अवतार म्हणजेच दत्तजयंती महाराष्ट्र व हद्दीजवळचे गांडगापुरला विशेष स्वरुपात साजरी होते.नगर जिल्ह्यातील देवगड या ठिकाणी अतिशय भक्तीमय वातावरणात दत्तजयंती साजरी केली जाते.
काल्याचे किर्तन श्रवण करण्यासाठी महिला वर्ग व तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती.या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते.भक्तीमय वातावरणात दत्तजयंती सोहळा पार पडला या वेळी पंचक्रोशीतील भावीक भक्त भजनी मंडळ ची उपस्थित लक्षणीय होती.

