shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोनामुळे पेझारीत दत्तजयंती उत्सव साधेपणाने होणार साजरे..!!

राजेश बाष्टे । अलिबाग प्रतिनिधी :-

सालाबादप्रमाणे यंदाच्यावर्षी देखील भगवान श्रीदत्तात्रेयांचा जन्मदिन दत्तजयंती निमित्त रायगड जिल्हा श्रीपंत सांप्रदायाचे मुख्य ठिकाण असलेल्या अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील श्रीदत्त मंदिरात सोमवार 28 डिसेंबर व मंगळवार 29 डिसेंबर 2020 रोजी साजरा होणारा श्रीदत्तजयंती उत्सव सोहळा यंदा कोरोनाचे सावट असल्याने अगदी साध्या पध्दतीने साजरा होणार असून दत्तजयंती निमित्त आयोजित करण्यात येणारा प्रेमध्वज पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख व श्रीपंत भक्त मंडळ पेझारीचे अध्यक्ष दिगंबर राणे यांनी दिली आहे.
close