shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुप्रिया पाटील आणि चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न..!!

राजेश बाष्टे ।अलिबाग प्रतिनिधी :-
सुप्रिया जयंत पाटील व चित्रलेखा नृपाल  पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर फणसापूर येथे मधुकर तेलगे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले.

दि. महाराष्ट्र स्टेट को. ऑप. बॅक्स असोसिएशन लि. मुंबईच्या अध्यक्षा, अलिबाग को-ऑप. अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया जयंत पाटील आणि शेकाप महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका चित्रलेखा नृपाल पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून फणसापूर येथे सीएफटीआय, समता फौंडेशन मुंबई, लायन्स हेल्थ फाऊंडेशन,अलिबाग यांच्या विद्यमाने आणि जिल्हा शासकीय रक्त केंद्र अलिबाग यांच्या माध्यमातून आज २२ डिसेंबर रोजी नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी लायन्स हेल्थ फाऊंडेशन,अलिबाग अध्यक्ष अभिजीत पाटील, माजी अध्यक्ष भगवान मालपाणी, महेंद्र पाटील, अँड. विजय पाटील, जिल्हा शासकीय रक्त केंद्राचे डॉ. दिपक गोसावी, हेमकांत सोनार, लायन्स हेल्थ फाऊंडेशनचे डॉ. अनिरुद्ध तेली, तालुका चिटणीस अनिल पाटील, सहतालुका चिटणीस अरुण भगत, जिल्हा परिषद सद्स्य मधुकर पारधी, बोरघर माजी सरपंच मधू ढेबे, वरंडेचे सरपंच सुधिर चेरकर, फणसापूर ग्रामपंचायत माजी सरपंच मधुकर तेलगे, माजी उपसरपंच गिरीश तेलगे, अनंत थळे, युवा नेते विक्रांत वार्डे, विभागातील ग्रामपंचायत सद्स्य, महिला, युवा कार्यकर्ते आणि लाभार्थी आदि मोठ्या संखेने उपस्थित होते.

यावेळी जवळपास दोनशे हून अधिक लोकांनी नेत्र तपासणी करून घेतली तर ४० हून अधिक लोकांनी रक्तदान केले. तर मोतीबिंदू शस्त्रक्रिया सीएफटीआय ट्रस्ट मार्फत केली जाणार आहे.  
close