shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिघीमधे पिस्टल व जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक..!!


पिंपरी चिंचवड:-पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि.18) दिघीतील मॅगझिन चौकात हि कारवाई करण्यात आली. 


प्रणव सुरेश कांबळे (वय 21, रा. गुरुदेव नगर, आकुर्डी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक आशिष ज्ञानदेव बनकर यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने 30 हजार किंमतीचे विनापरवाना एक लोखंडी पिस्टल व एक जिवंत काडतूस जवळ बाळगले होते. पोलिसांनी आर्म ॲक्ट कलमाखाली त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे करत आहेत.
close