श्रीरामपूर। प्रतिनिधी : श्रीरामपूर तालुक्यातील इच्छामणी मंगल कार्यालय वडाळा महादेव येथे शब्दगंध साहित्यिक परिषद, अहमदनगर शाखा श्रीरामपूर व राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त "राष्ट्रीय संत गाडगेबाबा पुरस्कार- 2020" आयोजन करण्यात आले होते.
पुरस्कार स्विकारताना अकबर शेख
या कार्यक्रमप्रसंगी देहरे येथील रहिवासी असलेले एसटी बस चालक अकबर बिबन शेख यांना उत्कृष्ट चालक सेवा दिल्यामुळे त्यांना "राष्ट्रीय संत गाडगेबाबा पुरस्कार 2020" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.शिरीष लांडगे, प्रा.डाॅ.बाबुराव उपाध्ये,शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी, प्रा.लक्ष्मण निकम,संपादक परिषदचे कार्याध्यक्ष तथा सा.वर्ल्ड सामना संपादक प्रकाश कुलथे; प्राताधिकारी.शैलेंद्र भणगे,शरद बनसोडे महाराज,राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे संस्थापक अध्यक्ष तथा "दैनिक चालक आंदोलन" चे संपादक रफीक हाजीमिया शेख,प्राचार्य डाॅ.गुंफा कोकाटे,कवि शेख मिराभक्ष बागवान,कवि आनंदा साळवे,पञकार राजेंद्रदेसाई; महेश कुलकर्णी, काशिनाथ चितळकर, इकबाल कक्कर, आदी पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रफीक भैया शेख यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन प्रा.दादासाहेब साठे व प्रा.सुनिल कुमार धस यांनी केले. तर आनंदा साळवे यांनी आभार मानले.

