shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षणासाठी समाजाला सरस्वती नाही तर सावित्री ची गरज- सविता लोंढे..!!


प्रतिनिधी। विशाल लोंढे :
सुरेगाव मधील अंगणवाडी क्र.23 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महिला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात आले.

आद्य शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य प्रेरणादायी व क्रांतीकारी आहे. सावित्रीबाईंचा निस्सीम त्याग व धैर्यामुळे आजच्या महिलेला समाजात मानाचे व प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त झाले आहे. महिलांना शिक्षित व सज्ञान होण्यासाठी सरस्वती ची नाही तर सावित्री ची गरज आहे.सावित्रीमाईंचे प्रगतशिल व शिक्षित समाज घडविण्याचे कार्य पुढे नेणे हिच खरी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सुरेगावच्या महिला ग्रामपंचायत सदस्या सविता लोंढे यांनी केले. 

अंगणवाडी सेविका आश्विनीताई वाघ  यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. शिक्षणाखेरीज मनुष्याचा विकास साधणार नाही असे सांगितले. प्रतिभाताई ठोके म्हणाल्या की फुले दाम्पत्यांनी जुन्या,चालीरित्या व रुढी परंपरांना मोडून काढण्याचे काम केले. समतेचा ज्वालामुखी ह्रदयात ठेवून कायम समाजसुधारणेचे कार्य केले.

तसेच सावित्रीमाई यांच्या जयंती दिवस स्त्री मुक्ती दिन व बालिका दिन म्हणून साजरा केल्या जातो. या दिनाचे औचीत्य साधून दोन कन्या जन्मावर समाधान मानून कुटूंब नियोजनाची शस्रक्रिया करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. आणि कोरोनो महामारीच्या साथीमध्ये आपले सेवा देण्याचे काम अंगणवाडी सेविकांनी केले. त्यांना कोविड योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका अश्विनी वाघ, संगीता क्षिरसागर, प्रतिभा ठोके, छाया खंडवे, विजया कदम, शुभांगी कानडे, नंदा मेहेरखांब, रंजना वाबळे, सुनंदा कोलते आणि पंचक्रोशीतील महिला, मुले, मुली मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
close