shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा सेवा संघाच्या शिवधर्म दिनदर्शिकेचे प्रकाशन..!!

महेश देशमुख (माढा) :
मराठा सेवा संघ पंढरपूर विभागच्या वतीने शिवधर्म दिनदर्शिकेचे पंचायत समिती, कुर्डूवाडीचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, कक्ष अधिकारी सयाजी बागल, सहाय्यक लेखा अधिकारी योगेश अवघडे,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मराठा सेवा संघाचे कुर्डूवाडी शहराध्यक्ष अरूण जगताप, तालुका संघटक शिवाजी गवळी, प्रताप गवळी, शिवाजी लोकरे, सुधीर पवार, बालाजी सरवदे, निलेश देशमुख तसेच मराठा सेवा संघ व ग्रामसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवधर्म दिनदर्शिका विज्ञानवादी, समतावादी, स्वतंत्रतावादी विचारांची दिनदर्शिका असल्याचे मत यावेळी डॉ.संताजी पाटील यांनी व्यक्त केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून 'सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवास' सुरुवात होणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांनी दिली.
close