अलिबाग। प्रतिनिधी (गणंजय शेट्ये): क्रांतीज्याेती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.
यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, नायब तहसिलदार दिलीप वाडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

