shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कौठळी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी.!!

कौठळी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी.!!
 इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार)

कौठळी: (दि 3 जाने.२१) जि. प. प्राथमिक शाळा कौठळी येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रतिमापूजन शाळेच्या उपशिक्षिका आरती गायकवाड व उपस्थित महिलांच्या हस्ते झाले.
यानंतर प्रास्ताविक मुख्याध्यापक नंदकुमार सुर्यवंशी यांनी केले.महिला शिक्षक दिन म्हणून शाळेतील शिक्षिका आरती गायकवाड यांच्या सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला.तसेच शाळेतील शिक्षक भारत ननवरे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार कालिदास मोरे सरांनी केला.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण,रांगोळी,कविता वाचन,लिंबू चमचा अशा स्पर्धा घेऊन यशस्वी 

विध्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, भारत ननवरे,आरती गायकवाड, कालिदास मोरे, नागेश पाटोळे,राजेश्री मोरे,त्रिशला पोळके सह महिलावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती गायकवाड यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका राजेश्री मोरे यांनी मानले.
close