वकीलवस्ती येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी (तात्याराम पवार )
वकीलवस्ती :(३ जाने.२१)जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त वकीलवस्ती ग्रामस्थ आणि सुभाष भोसले मित्र परिवाराच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अंकिता पाटील यांनी या शिबिराचे उदघाटन केले.
या शिबिरामध्ये ६० व्यक्तींनी सहभाग घेतला.१३ व्यक्तींवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
अंकिता पाटील यांनी आपला अभिष्टचिंतन हा समाज उपयोगी उपक्रमाद्वारे साजरा करण्याचे आवाहन केले होते याला प्रतिसाद देत वकील वस्ती ग्रामस्थ आणि सुभाष भोसले मित्रपरिवाराने मोफत नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन केले.
यावेळी राजेंद्र कोरटकर, नवनाथ घोगरे, सुभाष भोसले, सतीश दोरकर,बाबासाहेब भोसले, शिवाजी धुमाळ उपस्थित होते.

