वडाळा महादेव : वडाळा महादेव येथे सागर भालेराव यांच्या शेतात वर्कशॉप बांधकामाचे भूमिपूजन जेष्ठांच्या शुभास्ते करण्यात आले.
येथील नवयुवक सागर शिवाजी भालेराव याने वर्कशॉपचे प्रशिक्षण घेऊन आपल्याच गावात व्यवसाय करून आपले जीवनमान जिद्दीच्या व मेहनतीच्या बळावर उंचावण्याचे ठरवले आहे. सागर हा अतिशय मेहनत करणारा प्रामाणिक व इमानदार तरूण आहे. त्याने या व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याला अनेक जेष्ठांनी नवीन वर्षाच्या व व्यवसाय वृद्धींगत होण्यासाठी पञकार रमेश जेठे, पञकार रफीक भैय्या शेख, माजी सरपंच किशोर जेठे व अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
आज नवीन वर्षाच्या शुभारंभिच सागर भालेराव यांच्यात शेतात वर्कशॉप च्या बांधकामाचे भूमिपूजन गावातील जेष्ठांच्या शुभास्ते करण्यात आले.
यावेळी अनिल फोफसे; संजय तेलोरे; संजय वळकुंटे;शिवाजी पवार; त्यांचे वडील शिवाजी भालेराव सर; व गावातील आप्तेष्ठ नातेवाईक मिञमंडळी उपस्थित होते.

