shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात वडापाव विक्रेत्याचा पाठलाग करून केला वार, विश्रांतवाडीतील घटनेने खळबळ..!!


पुणे:-वडापाव विक्रीची हातगाडी लावण्याच्या वादातून तिघांजणांनी मिळून तरूणाला बांबूने मारहाण पाठलाग करून कोयत्याने वार केला. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री सातच्या सुमारास विश्रांतवाडीतील एका मॉलसमोर घडली.

राज बबन राक्षे (वय 18) आणि प्रवीण उर्फ पव्या संभाजी सुखदरे (वय 30, रा. विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पंकज शर्मा (वय 28, रा. विश्रांतवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.

विश्रांतवाडीतील एका मॉलसमोरील पदपथावर पंकज गौरंगी डोसा व  वडापाव विक्री हातगाड्यावर कामाला आहे. त्याचा राग मनामध्ये धरून परिसरातील एका वडापाव विक्रेत्या महिलेने  पंकजला दमदाटी केली.

तू इथे काम करत जाउ नकोस, आमचा धंदा होत नाही, येथून निघून जा नाहीतर तुला सोडणार नाही, असे म्हणत धमकी दिली. त्यानंतर महिलेने वडापाव हातगाडीवर काम करणा-या राज आणि प्रवीण या कामगारांना बोलावून पंकजला मारहाण करण्यास सांगितले.

त्यानुसार दोघांनी पंकजला बांबूने मारहाण केली.  त्यामुळे पंकज पळत असताना दोघाजणांनी त्याचा पाठलाग करून कोयत्याने  वार केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. पी. यादव तपास करीत आहेत.
close