shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सरकारी कामात अडथळा..शिर्डी ग्रामस्थांवर होणार कार्यवाही..?


सावळीविहीर (प्रतिनिधी) :31 डिसेंबरच्या रात्री व एक जानेवारीच्या पूर्वसंध्येला शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. या दिवशी 31 डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान शिर्डीतील काही ग्रामस्थांनी अनधिकृतपणे संस्थांनच्या गेट नं.पाच व पी.आर.ओ. गेट नं.मधून अनधिकृतपणे प्रवेश करत सरकारी कामात अडथळा आणला.

अशाप्रकारचा तक्रारअर्ज श्री साईबाबा संस्थानने शिर्डी पोलिसांकडे दिला असून त्यासंदर्भातली चित्रफीतही, डीव्हीडी देण्यात आली आहे. डीव्हीडी मधील व सीसी टीव्ही फुटेज बघून संबंधित ग्रामस्थांवर सरकारी कामात अडथळा आणला. म्हणून कारवाई करण्यात यावी.अशी मागणी या पत्रात श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने शिर्डी पोलिसांकडे केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री श्री साईबाबा मंदिर दरवर्षाप्रमाणे यावर्षी दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. सशुल्क पास घेणाऱ्या साईभक्तंसाठी गेट नंबर एक व जनरल रांगेसाठी गेट नंबर 2 मधून साई भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येत होते. मात्र शिर्डीतील काही ग्रामस्थ यांनी 31 डिसेंबरच्या रात्री साडेअकरा वाजेच्या दरम्यान गेट नंबर 5 व पी.आर.ओ. गेटमधून संस्थान परिसरात अनधिकृतपणे प्रवेश केला. संस्थांनचे कर्मचारी अधिकारी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी उद्धट पणा दाखवला. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये,व्हिडिओ शूटिंग मध्ये स्पष्ट दिसत असून ती डीव्हीडी श्री साईबाबा संस्थानने शिर्डी पोलिसांकडे दिली आहे. तसेच एक तक्रार अर्ज केला असून या तक्रार अर्जात सीसीटीव्ही फुटेज पाहून ज्या ग्रामस्थांनी श्री साई मंदिरपरिसरात अनधिकृत प्रवेश करून सरकारी कामात अडथळा आणला त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. 

या संदर्भात शिर्डीचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असता पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांनी सांगितले की श्रीसाईबाबा संस्थांननी तसा अर्ज पोलिसांकडे दिला असून डिव्हीडी दिली आहे. या डीव्हीडीवर सीसी टीव्ही फुटेजचे अवलोकन करून त्यात तथ्य आढळल्यास संबंधित ग्रामस्थांवर ही कारवाई करण्यात येईल.

असे यावेळी पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी सांगितले.दरम्यान या अर्जानंतर व चर्चेनंतर शिर्डी मध्ये ग्रामस्थ व साईबाबा संस्थान व्यवस्थापन यामध्ये हे प्रकरण नक्कीच गाजणार असल्याचे दिसून येत आहे. हे प्रकरण पुढे काय वेगळे वळण घेते की काय? विशेष म्हणजे शिर्डीचे नगराध्यक्ष हे श्री साईबाबा संस्थानचे पदसिद्ध विश्वस्त असतात. त्यांनाही  यावेळी अडविण्यात आले होते.
close