.
प्रतिनिधी । मोहन शेगर
सोनई- दि.27 डिसेंबर 20 रोजी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य कार्यकारणी व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे महत्वपुर्ण बैठक झाली. यामध्ये नेवासा तालुका ञिदल संघाचे तालुकाध्यक्ष मेजर अशोक चौधरी (सर) यांची महाराष्ट्र राज्य कोर कमिटी प्रमुखपदी निवड करण्यात आली.तसेच कायदेशिर सल्लागारपदी अॅड.रेश्माताई यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांचे सत्कार झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ञिदल संघाचे अध्यक्ष संदिपभाऊ लगड प्रमुख मान्यवर म्हणुण उपस्थित होते.यावेळी काही नवीन पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या.
ञिदल सैनिक संघाच्या महाराष्ट्र कोअर कमिटी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्काराला उत्तर देतान मेजर अशोक चौधरी सर म्हणाले कि मी 35 वर्ष शासकिय सेवा केली आहे.मिलिटरी मध्ये व घाडगे पाटील सैनिक स्कुल मध्ये काम केले.ञिदलच्या माध्यमातुन माजी सैनिकांच्या परिवारातील कुठल्याही सदस्याला काही अडीअडचण व प्रश्न असेल तर नेहमी पुढे होवुन संघाच्या हितासाठी काम करत आलो आहे.यापुढे ही माजी सैनिकांच्या परिवारासाठी प्रश्न सोडवण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे. कार्यक्रमास ञिदलसंघाचे प्रदेशाध्यक्ष संदिपभाऊ लगड, उपाध्यक्ष संजय लगड,सचिव संपत शिरसाठ, नेवासा ञिदल संघाचे उपाध्यक्ष शरद दरंदले,भारतीताई लगड, अँड.रेश्माताई, जगताप साहेब, नेवासा शाखेचे सचिव,अरुण इखे पाटील, बद्रिनाथ ईसरवाडे ञिदल संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अतीशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.

