shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री भरणेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी..!!

राज्यमंत्री भरणेंची क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी..!!

 इंदापूर प्रतिनिधी:(दि.२९)इंदापूर येथे  अजित ढवळे फाउंडेशन श्रीनाथ क्रिकेट क्लब च्या वतीने भव्य दिव्य अशा क्रिकेट स्पर्धेचेआयोजन करण्यात आले आहे, त्याची पाहणी करण्यासाठी व अंतिम सामन्याच्या नाणेफेक करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या कार्यकर्त्यांसह मैदानामध्ये उपस्थित राहिले होते.
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाळासाहेब ढवळे -पवार व आयोजकांनी मंत्री महोदय यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या विनंतीला मान देत दत्तात्रय भरणे यांनी बॅट हातात घेऊन मैदानात तूफान फटकेबाजी केली. 

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची राजकारणातील फटकेबाजी इंदापूर करांना माहित आहे पण मात्र क्रिकेटच्या मैदानावरील त्यांनी केलेली फटकेबाजी इंदापूरकर यांना आज पहावयास मिळाली
close