इंदापूर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते नेहा कोल्ड्रिंक दुकानाचे उद्घाटन संपन्न ..!!
इंदापूर प्रतिनिधी:(दि.२९)इंदापूर कोर्टा समोरील महाजन बिल्डिंग येथे ख्वाजा भाई बागवान यांनी नवीनच सुरू केलेला कोल्ड्रिंग व्यवसाय अतिशय दर्जेदार आणि उत्तम अशी आकर्षक निसर्गमय सजावट करून तयार केलेल्या या व्यवसायाचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्रीतथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते नेहा आईस्क्रीम व मस्तानी कोल्ड्रिंक व्यवसायाचे उद्घाटन संपन्न झाले
यावेळी इंदापूर येथील इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे ,नगरसेवक पोपट शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, नगरसेवक अमरदादा गाडे,सामाजिक कार्यकर्ता रमेशआबा शिंदे,इंदापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष उमा इंगोले,गालिब बागवान,आजित बागवान,सोहीब बागवान. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गेली अनेक वर्षापासून बागवान कुटुंबीय हे कोल्ड्रिंग च्या व्यवसायात आहेत .उत्तम दर्जाचे व स्वादिष्ट असे कोल्ड्रिंक्स मिळण्याचे दुकान म्हणजेच नेहा कोल्ड्रिंक्स असे इंदापूर शहरासह तालुक्यात त्यांची ख्याती आहे .सदर दुकान हायवे लगत असल्याने पुणे-सोलापुर महामार्गावरून जाणारे अनेक प्रवासी स्नेहा कोल्ड्रिंक्स चा आस्वाद घेण्यासाठी या दुकानात गर्दी केलेली पाहावयास मिळते.

