सावळीविहीर( प्रतिनिधी):
राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण आज गुरुवार दिनांक 28 जानेवारी रोजी राहाता येथे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या नेतृत्वाखाली व शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित सोडत पद्धतीने काढण्यात आले असून राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे निघाले आहे.
राहाता तालुक्यातील डोराळे, कनकुरी ,कोल्हार बुद्रुक, ममदापूर ,न.पा.वाडी ,नांदुरखी खुर्द व निर्मळ पिंपरी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाले आहे,तर भगवतीपुर चंद्रापूर,दाढ बुद्रुक,धनगरवाडी, हसनापूर, लोहगाव, पिंपळस, रामपुरवाडी या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित सुचित जाती साठी राखीव असून येथे अनुसूचित जातीचा पुरुष किंवा महिला सरपंच होऊ शकते.
त्याच प्रमाणे आडगाव बुद्रुक, निघोज, पुणतांबा या ग्रामपंचायतीचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव निघाले आहे व आडगाव खुर्द, हनुमंतगाव, पिंपरी लोकाई,या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती पुरुष किंवा महिला साठी राखीव झाले आहे.
त्याच प्रमाणे राहाता तालुक्यातील केलवड बुद्रुक ,लोणी बुद्रुक, नांदूर, रांजणगाव खुर्द ,साकुरी, शिंगवे, वाकडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाला आहे. तसेच तालुक्यातील एकुरखे, गोगलगाव ,जळगाव, लोणी खुर्द, पिंपळवाडी ,तिसगाव या ग्रामपंचायतीचे सरपंच पद नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष किंवा महिलांसाठी राखीव झाला आहे.
तसेच राहाता तालुक्यातील बाभळेश्वर, दहेगाव कोराळे, खडकेवाके ,कोराळे ,राजुरी, रांजणगावखोल, रुई, वाळकी या ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव निघाले आहे ,तसेच अस्तगाव, चितळी, दुर्गापूर, नांदुरखी बुद्रुक, निमगाव कोर्हाळे ,पाथरे बुद्रुक, सावळीविहीर बुद्रुक, सावळीविहीर खुर्द या गावांच्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण निघाले आहे.
आज राहाता येथील प्रशासकीय इमारतीच्या पंचायत समितीच्या हॉलमध्ये तहसीलदार कुंदन हिरे यांच्या नेतृत्वाखाली व अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित व्यक्ती नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत या ग्रामपंचायतीचे आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे, सोडत काढल्यानंतर या ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये आता सरपंच होण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे .राहाता तालुक्यात नुकत्याच पंचवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.
सहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या व एकोणीस ग्रामपंचायतीच्या मतदान होऊन मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाले आहेत व आज गुरुवार रोजी सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले आहे. त्यामुळे आता या पंचवीस ग्रामपंचायतीमध्ये नविन सरपंच होण्यासाठी आता ग्रामपंचायत सदस्य व त्या गावातील नागरिकांमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत .तसेच उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुका नंतर होणार असल्या तरी सरपंच पद व आरक्षण जाहीर झाल्यामुळे त्या दृष्टीने त्या त्या गावातील मतदार,नेते, पुढारी ,हे सरपंच होण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु झाले आहे.
आज गुरुवार 28 जानेवारी रोजी राहाता येथे सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर होताच सर्वत्र तालुक्यात प्रत्येक गावागावात ही चर्चा सध्या सुरू आहे. मात्र ही आरक्षणे जाहीर झाल्यानंतर सरपंच होण्याची इच्छा असणाऱ्यांच्या अनेकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे काहींमध्ये खुशी तर काहींमध्ये नाराजीही ही आता स्पष्ट दिसू लागली आहे .कारण काही ठिकाणी आरक्षण पडल्यामुळे सरपंचाची संधी हुकली आहे. त्यामुळे अशा लोकांमधून, सदस्यांमधून नाराजीही व्यक्त होत आहे.

