shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साखर पुढ्याला गेले अन् लग्न लावूनच परतले..!धोञे आणि सुरे यांचे आज विवाह सोहळा संपन्न....!!

नाशिक। प्रतिनिधी:
नाशिकचे भूषण असलेले व गव्हर्मेंट पाॅलीटेक्नीक,ठाणे चे विभागप्रमुख डाॅ.सुखदेव तुकाराम धोञे यांची सुकन्या चि.सौ.कां.सुप्रिया व औरंगाबाद येथील माजी नगरसेवक कै.देवीदास काळू सुरे यांचे सुपुञ चि.पंकज उर्फ बंटी (नगरसेवक) यांचा शनिवार दि.30जानेवारी 2021 रोजी लक्षिका हाॅल,लवाटेनगर,नाशिक येथे साखरपुड्याचे कार्यक्रम नियोजनाप्रमाणे ठरले होते.

पण एकूणच साखरपुडा कार्यक्रमाची गर्दी पहाता आमदार श्री.उदयसिंग राजपुत व वडार समाज संघ,महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री.राकेश विटकर यांनी दोन्ही परिवाराच्यावतीने सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत मध्यस्थी करून साखर पुढ्यातच विवाह सोहळा होण्यासाठी दोन्ही परिवारांना विनंती केली.या विनंती ला दोन्ही परिवारांनी तत्परतेने मान्यता दिल्यानंतर हा विवाह सोहळा साखरपुड्यातच विधीवत व थाटामाटात संपन्न झाला..!

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माजी खासदार श्री.चंद्रकांत खैरे यांचे चिरंजीव श्री.ऋषीकेश खैरे, श्री.गुंडाप्पा देवकर,वडार समाज संघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस श्री.दिलीप गुंजाळ, श्री.दशरथ गायकवाड, श्री.सतीश चव्हाण आणि, पुणे, सिन्नर, नाशिक,औरंगाबाद,कन्नड येथील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक, मिञमंडळी, नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
close