राजगुरुनगर । प्रतिनिधी ( विद्याधर साळवे):
राजगुरुनगर :- नाभिक समाजाच्या विविध मागण्यांसाठी खेड तालुका नाभिक सलुन असोसिएशनच्या वतीने खेड उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन...!
नाभिक समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खेड तालुका नाभिक सलुन असोसिएशनच्या वतीने खेड उपविभागीय अधिकारी, खेड तहसीलदार व खेड तालुक्याचे आमदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.
नाभिक समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या गेली अनेक वर्षे दुर्लक्षित राहिल्या आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने १) नाभिक समाजाला दारीद्ररेषे खालील उत्पन्न दाखला मिळावा २) नाभिक समाजाला भुमिहिन असल्याचा दाखला मिळावा ३) नाभिक समाजाला शासकीय व सार्वजनिक जागी व्यवसायाला भुईजागा, टपरी, दुकान गाळा, देण्यात यावा ४) नगरपरिषद हद्दितील आरक्षित भुखंडामध्ये नाभिक समाजाला समाज मंदिर, मंगल कार्यालय, गृहनिर्माण संस्था यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी ५) नाभिक समाजातील काही कारागिर हे इतर सलुनमध्ये कींवा रोजंदारीने काम करीत असल्याने त्यांना असंघटित कामगार दाखला मिळावा.व त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे मिळावीत.
नाभिक समाज हा इतर मागास प्रवर्गातील व बारा बलुतेदारांपैकी एक आहे.नाभिक समाजातील ८०/ टक्के समाजास शेतजमीन वा घर मिळकत देखिल नाही.तसेच कोविड १९ च्या काळात तर नाभिक समाज हा व्यवसाय व रोजगार हिन झाला होता.नाभिक समाज हा अल्पसंख्याक असुन, ग्रामीण भागात तर एक दोन कुटुंब कींवा एकहि कुटुंब नसलेला समाज आहे.अश्या ह्या समाजाच्या मागण्या देखिल त्याच प्रमाणात असल्याने, शासनाला त्याची पुर्तता करणे देखिल अवघड नाही.
तरी शासनाने नाभिक समाजाच्या मागण्यांचा सहानुभूती पुर्वक विचार करावा.अशी मागणी खेड तालुका नाभिक सलुन असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष आबा गायकवाड यांनी खेड तालुका आमदार दिलीप मोहिते पाटील,खेड तालुका उपविभागीय अधिकारी व खेड तालुका तहसीलदार यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी खेड तालुका नाभिक सलुन असोसिएशनचे अध्यक्ष
सचिन (आबा) गायकवाड, योगेश भालेराव, महेश दळवी, राऊत, महेश गायकवाड, दर्शन गायकवाड, कृष्णा आतकर
वसंत पंडीत आदी मान्यवर व नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

