प्रामाणिकपणाबद्दल कर्मचाऱ्यांचे कौतुक..!!
सावळीविहीर( प्रतिनिधी):
श्री साईबाबांनी श्रद्धा व सबुरीची शिकवण दिली. सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. तसेच साईभक्तांची सेवा हीच परमेश्वर सेवा असे समजून भक्तांना उपदेश केला व याच शिकवणीतून ,उपदेशातून शिर्डीमध्ये आजही अनेक जणांकडून हा उपदेश, इमानदारी, प्रामाणिकपणा आचरणात आल्याचे दिसून येते.
असाच प्रकार शिर्डी येथील साईबाबा संस्थांनच्या साई आश्रमात घडला. येथील स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एका साईभक्तांची सोन्याची चैन हरवली होती. ती काम करत असताना सापडली व दुसऱ्या दिवशी ती प्रामाणिकपणे त्या साईभक्तांना परत केली व आपला प्रामाणिकपणा दाखवला, असे अनेकदा घडत असते.असा हा प्रामाणिकपणा आजच्या आधुनिक युगात कोठे दिसून येत नाही मात्र तो शिर्डीत दिसून आला.
त्यामुळे या प्रमाणिक कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे. कौतुक होत आहे, त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, श्री साईबाबा संस्थान च्या साई आश्रम भक्तनिवास विभागातील कंत्राटी कर्मचारी (आऊटसौर्स) श्री.दत्तात्रय बिरदोडे व श्री.संदीप गायकवाड यांना दि.१४/०१/२०२१ रोजी साईआश्रम स्वागतकक्ष परिसरात स्वच्छता करतांना एका साईभक्ताची अंदाजे दोन तोळे वजनाचे सोन्याची चैन सापडली. त्यांनी ती प्रामाणिकपणे साईआश्रम कार्यालयात जमा केली.दुसऱ्या दिवशी सदर भक्त हि चैन शोधत आले असता साई आश्रम कार्यालयामार्फत ओळख पटवून ती परत देण्यात आली. सदर साई भक्तांना चैन मिळाल्यावर झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यासारखा होता.
याप्रसंगी साईआस्रम भक्तनिवास चे अधिक्षक श्री पुंजाहरी कोते, सुमित कंपनीचे मँनेजर श्री बापुसाहेब चिंधे,साईभक्त श्री व सौ वेणु गोपाल, पी रत्नमा ,प्रर्यवेक्षक श्री प्रकाश वाणी ,श्री अशोक कोते ,श्री प्रसाद भातोडे, श्री प्रसाद गोंदकर, प्रवीण धनवटे,सागर बच्छे ,दिंगबर दराडी व दत्तात्रय बिरदोडे, संदिप गायकवाड यांचे प्रामाणिकपणाबद्दल सर्व कर्मचारी कौतुक होतआहे. या प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मानही करण्यात आला.
असा हा संस्थान कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक बद्दल विश्वास साई भक्तांमध्ये निर्माण झाला तर हा मेसेज देश-विदेशात जातो, साई बाबा संस्थान, शिर्डी, साई संस्थान कर्मचारी-अधिकारी यांच्याबद्दल एक चांगला मेसेज हा सर्व जगभर पोहोचतो,त्यासाठी साई संस्थान कर्मचारी ,अधिकाऱ्यांनी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आता बोलले जात आहे.

