राजगुरुनगर । प्रतिनिधी (विद्याधर साळवे): दि.१५-०१-२०२१
राजगुरुनगर शहरात असलेल्या वीरा ऑप्टिक्स चे मुख्य संचालक संदीप थिटे यांच्या माध्यमातून राजगुरुनगर शहरातील ७ वयोवृद्ध रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
वयोवृद्ध नागरिकांना डोळ्यातील मोतीबिंदू मुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी हजारो रुपये लागत असल्यामुळे गरीब कुटुंबातील वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे जिकिरीचे जाते ही अडचण लक्षात घेऊन राजगुरुनगर शहरातील वीरा ऑप्टिक्स चे संचालक प्रोप्रायटर संदीप थिटे यांनी या वयोवृद्ध रुग्णांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन वीरा ऑप्टिक्स च्या वतीने राजगुरुनगर शहरात कायमस्वरूपी तपासणी केंद्र व मोतिबिंदू शस्त्रक्रिया कक्ष सुरू करण्यात आला आहे.
राजगुरुनगर शहरातील सात वयोवृद्ध रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी वीरा ऑप्टिक्स च्या माध्यमातून एच. व्ही.देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी हडपसर पुणे येथे या सात रुग्णांना स्वखर्चाने नेऊन मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या मोफत केली असल्याची माहिती वीरा ऑप्टिक्स चे संचालक संदीप थिटे यांनी दिली. आगामी काळात राजगुरुनगर येथील वीरा ऑप्टिक्स येथे कायमस्वरूपी तपासणी केंद्र व मोतिबिंदू शस्त्रक्रिया कक्ष सुरू करण्यात आला असून या सेवेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संदीप थेटे यांनी केले आहे.

