shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कल्याण मुंबई जुगाराचा ( मटका) केज शहराला विळखा ..!!

केज । जिल्हा प्रतिनिधी प्रकाश मुंडे  :-                    केज शहरात अवैध धंदे चालवणाऱ्या बुकी व मटका चालवणाऱ्या लोकांनी केज शहरातील सुसंस्कृत केज नाव पुसुन टाकण्याचा जणू चंग बांधला आहे.                        


केज शहरातील पोलीस प्रशासन कसलीही कारवाई करत नसल्याने त्यांना कश्याचिही भिती राहिली नाही.                  
***शिर्डी एक्सप्रेस ने बातमी लावल्या नंतर फक्त एक दिवस सोमवारी केज शहरातील अवैध धंदे बंद होते***.                   

परंतु लगेच मंगळावर पासून हे अवैध धंदे बिनधास्त पणे केज शहरात राजरोस पणे चालू झाले आहेत.                               
केज शहरातील अवैध धंद्यां मुळे अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तर अनेक घरी रोज भांडणे होत आहेत. घरातील कमवती व्यक्ती मटक्यामुळे व अवैध दारू पिऊन चार कमवलेले पैसे खर्च करून वाममार्गाला लागत आहे.                        

केज शहरातील या कल्याण व मुंबई मटक्याची रोजची उलाढाल लाखोंच्या घरात जात आहे. तर एका आठवड्यात करोडो रुपयांचा चुराडा  केज शहरात होत आहे.                               

हे अवैध धंदे चालवणाऱ्या लोकांनी शहरातील मुख्य पाॅइंट ताब्यात घेऊन किरायाने करून मोठ मोठे गाळे थाटल्यामुळे शहरातील मुख्य ठिकाणी या जुगाऱ्यांची वर्दळ व धिंगाणा हे रोजचेच झाले आहे.         

शहरातील पोलीस प्रशासन, एल सी बी पथक तसेच एस पी पथक यांची थोडी सुद्धा भिती या कल्याण मुंबई मटका चालवणाऱ्या दोन नंबरवाल्यांना राहिली नाही.                         
वर खाजगीत बोलताना आम्ही किती लोकांना हप्ता देतो म्हणून अम्हांला कोणत्याही धाडीचि किंवा पोलीस कारवाई ची भिती वाटत नाही असे हे अवैध धंदे चालवणारे महाभाग छाती ठोकून सांगत आहेत. ह्या सर्व प्रकारामुळे केज शहरातील शैक्षणिक, सांस्कृतिक वातावरण दुषित होत आहे.                                          
केज शहरातील पोलीस प्रशासनाने या कल्याण मुंबई चालवणाऱ्या लोकांवरती कडक कारवाई करून शहरातील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी केज शहरातील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थी, पालक सर्व सामान्य जनतेकडून होत आहे. 

तर अनेक सामाजिक संघटना निवेदन देऊन हे केज शहरातील अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी लावून धरत आहेत.       

केज शहरातील पोलीस प्रशासनाने या कल्याण मुंबई ( मटका) चालवणाऱ्या लोकांवरती कडक कारवाई करून त्यांना बेड्या ठोकाव्यात व सर्व सामान्य माणसाला न्याय द्यावा अशी केजकरांना पोलीस प्रशासना कडून अपेक्षा आहे.
close