shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साई संस्थांनवर नवीन विश्वस्त मंडळाची नियुक्ती अंतिम टप्प्यात! मात्र कधी होणार जाहीर..!!

सावळीविहीर( प्रतिनिधी) :
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेवर नवीन विश्वस्त मंडळ हे शासन लवकरच नियुक्त करणार असून ते अंतिम टप्प्यात आहे. असे औरंगाबाद उच्च न्यायालयात सरकार तर्फे सांगितले असता उच्च न्यायालयाने हे विश्वस्त मंडळ नेमताना संस्थान अधिनियम 2005 व सन 2013 चे नियम, विनियम  व उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच नियुक्त करावे. 

असे आदेश आज गुरुवारी औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान वर नवीन विश्वस्त मंडळ लवकरच मार्गदर्शक तत्वानुसार नियुक्त होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.अशी माहिती याचिकाकर्ते संजय भास्कर काळे यांनी दिली आहे.मात्र हे नवीन विश्वस्त मंडळ येत्या प्रजासत्ताक दिनाला 26जानेवारी पूर्वी नियुक्त होणार का? असेही साईभक्त, शिर्डीकर  बोलत आहेत.

 उच्च न्यायालयाच्या  औरंगाबाद खंडपीठा मध्ये काल श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी च्या नवीन विश्वस्त मंडळ नियुक्ती बाबत सुनावणी होती, ही सुनावणी  निकालात काढण्यात आली आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीची फेरतपासणी साठी यापूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने चार सदस्य समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. मा,उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती वासंती नाईक यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नियुक्त झाली होती.सदर समितीचा अहवाल पारदर्शक नसल्यामुळे याचिका करते संजय काळे यांनी सदर अहवालाला उच्च न्यायालयात आवाहान दिले 

होते.दरम्यानच्या काळात संस्थांनच्या तत्कालीन विश्वस्ताचे अधिकार गोठवत उच्च न्यायालयाने संस्थांनचा कारभार चार सदस्य समितीकडे सोपवला होता. आज 14 जानेवारी गुरुवार रोजी यासंदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयात सरकार पक्षाने नवीन विश्वस्त मंडळ लवकरच येत असल्याचे व ते  अंतिम टप्प्यात असल्याचे न्यायालयात सांगितले. त्या धर्तीवर न्यायालयाने नवीन विश्वस्त नेमताना श्री साईबाबा संस्थान अधिनियम 2005 मधील कलम 5/8/9 चे सक्त पालन करुन तसेच सन 2013 चे विश्वस्त नियुक्त नियम विनियम चे सक्तीने पालन होऊन जनहित याचिका 150/ 2016 मधील पारित केलेल्या आदेशातील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच हे नवीन विश्वस्त मंडळ नेमले जावे.असे मत नोंदवले व असा आदेश करीत न्यायमूर्ती एस,व्ही,गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस,डी, कुलकर्णी यांनी संजय काळे यांची याचिका निकाली काढली आहे.

 या याचिकेत संजय काळे यांच्या तर्फे एडवोकेट प्रज्ञा तळेकर व एडवोकेट अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.या नवीन विश्वस्त मंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले किंवा गुन्हे दाखल असलेले विश्वस्त नियुक्त करता येणार नाहीत तसेच नवीन विश्वस्त नियुक्ती मध्ये आठ अनुभवी उच्चशिक्षित सन 2013 च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे विश्वस्त मंडळ नियुक्त राहतील, असे म्हटले आहे. या संस्थांनच्या अधिनियमाप्रमाणे सरकार नवीन विश्वस्त मंडळ लवकरच श्री साईबाबा संस्थान वर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवकरच श्री साईबाबा संस्थानवर नवीन विश्वस्त मंडळ येईल.असी आता  या  आदेशाने शिर्डी व परिसरात त्याच्या सुरू झाली असून येत्या प्रजासत्ताक दिनाला 26 जानेवारी 20 21 पूर्वी राज्य सरकार व विधी व न्याय खाते श्री साईबाबा संस्थान वर नवीन विश्वस्त मंडळ नियुक्त करणार का? कि काही कायदेशीर पळवाटा काढून विलंब करणार! असीही चर्चा शिर्डीकर व साई भक्तांमध्ये होत आहे. शिर्डीत सध्या तदर्थ समिती कारभार पाहत आहे, 

या समितीमध्ये माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश तसेच जिल्हाधिकारी अश्या वरिष्ठ अधिकारी दर्जाच्या व्यक्ती आहेत. मात्र त्यांना दररोज मोठे शासकीय कामकाज असते, त्यामुळे येथे लवकर शासनाने नवीन विश्वस्तमंडळ न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करावे जेणेकरून साई संस्थांनचे विविध विकास योजना ,विकास कामे तसेच प्रस्तावित कामे शासनाकडून विविध विकास कामांसाठी मिळण्यात येणारा निधी व येथील प्रशासनात सुधारणा आदी सर्व गोष्टी करता येतील. असे आता साईभक्त व शिर्डीकर बोलत आहेत.
close