shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार महेश लांडगे- बेरोजगार युवकांसाठी नोकरी महोत्सवासारखा उपक्रम गरजेच्या..!!

पिंपरी चिंचवड:-कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच शिक्षण पूर्ण करूनही नोकरी न मिळणाऱ्या युवकांची संख्या जास्त आहे. अशाच बेरोजगार युवकांच्या नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी महोत्सवासारखे कार्यक्रम आवश्यक आहेत. हीच परिस्थिती ओळखून नगरसेवक वसंत बोराटे यांनी हा स्तुत्य उपक्रम घेतला. असे उपक्रम मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे मत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेशदादा लांडगे यांनी व्यक्त केले.

नगरसेवक वसंत बोराटे यांनी मोशी येथे आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवामध्ये चाळीसहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या होत्या. सात हजार युवकांपैकी दोन हजार युवकांना नोकरी मिळाली. महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी महापौर, नगरसेवक नितीन काळजे, नगरसेविका अश्विनी जाधव, सारिका बो-हाडे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, माजी ज्येष्ठ नगरसेवक बबन बोराटे, सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड, नितीन सस्ते, भाजयुमोचे शहराध्यक्ष संकेत चोंधे, उपाध्यक्ष, दिनेश यादव, रवी जांभूळकर, सुरेश म्हेत्रे यांच्यासह मोशीतील अनेक सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
close