shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या परिसरात गवत व काटेरी झाडे वाढल्याने जॉगिंग ट्रॅक येथील साफसफाई करण्याची मागणी संदर्भात जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन..!

नगर (प्रतिनिधी)-  शिवा म्हस्के
अहमदनगर शहरातील  ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरातील जॉगिंग ट्रॅक साफ-सफाई करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहराध्यक्ष शहानवाज शेख, जिल्हा अध्यक्ष अमोल भंडारे, मच्छिंद्र गांगर्डे, संतोष उदमले, अमित गांधी, दीपक गुगळे, शहबाज शेख, संतोष त्रिंबके, सुशील साळवे, लक्ष्मण साळे, बाळासाहेब धीवर, शाहिद सय्यद, वसीम शेख,श्रीपाद वाघमारे, किरण जावळे, संतोष टेमक आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.  

कोरोना काळा दरम्यान प्रशासनाने सर्वच सार्वजनिक ठिकाण सह जॉगिंग ट्रॅक वरती गर्दी होऊ नये यासाठी काही महिन्यापूर्वी सर्व ठिकाणे बंद केली परिणामी अहमदनगर शहरातील सर्वात मोठा जॉगिंग ट्रॅक असलेले भुईकोट किल्ला परिसरातील शासनाने नव्याने तयार केलेला जॉगिंग ट्रॅक शहरापासून अगदी जवळ आणि निसर्गरम्य ठिकाण असल्याने या ट्रॅक वरती अनेक लोक आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकाळ-संध्याकाळी व्यायामासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठी येत असतात. परंतु अनेक दिवसापासून जॉगिंग ट्रॅक बंद असल्याने त्याच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. परिणामी या सर्व भागात गवत तसेच झाडाझुडपांचा साम्राज्य निर्माण होऊन ट्रॅकची दुरावस्था झालेली आहे. या कोरोना परिस्थितीमध्ये आरोग्याच्या समस्या न उद्भवणयासाठी तसेच आरोग्य उत्तम राहण्यासाठी अनेक जण या ट्रॅकवर येत असतात.

त्यामुळे तो ट्रॅक लवकरात लवकर व्यवस्थित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
close