सावळीविहीर (प्रतिनिधी) :
राज्यातील उच्च माध्यमिक व माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांचे तारखा राज्याचे शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड यांनी घोषित केल्या आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक म्हणजे बारावीच्या वार्षिक परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 20 21 या दरम्यान राज्यांमध्ये होणार आहे.बारावीच्या माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षा 27 मे ते 5 जून 20 21 या दरम्यान होणार असून बारावीच्या प्रात्यक्षिक तसेच तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 27 मे ते दोन जून या दरम्यान होणार आहे, या बारावी परीक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागण लावण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे माध्यमिक म्हणजे इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 20 21 या दरम्यान होणार आहेत व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तोंडी, प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 28 मे ते 3 जून या दरम्यान होणार असून दहावीतल्या दिंव्यागविद्यार्थ्यांच्या कार्य विषयी परीक्षा 28 मे ते 9 जून2021 या दरम्यान होणार आहे.
या परीक्षेचा निकाल ऑगस्ट अखेर लागणार आहे असे ना.वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. covid-19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
असेही राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितले आहे.

