श्री शिवाजी विद्यालय बावडा येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..!!
इंदापूर प्रतिनिधी ( तात्याराम पवार):श्री शिवाजी विद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात संपन्न. ध्वजारोहण बावडा प्राथमिक आरोग्य अधिकारी डाॅ.कपिलकुमार वाघमारे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी संविधान संहिता वाचन करण्यात आले.
या प्रसंगी कोरोना काळात आपले काम चोखपणे बजावणारे आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी,बावडा गावातील सर्व खाजगी डाॅक्टर व पर्यवेक्षक श्री जगताप जी.जे यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती बावडा गावचे सरपंच आणि श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडाचे. सचिव किरण(काका) पाटील ,उपाध्यक्ष मनोज पाटील.खजिनदार उमेश(बापू) सुर्यवंशी.संचालक स्वप्निल घोगरे,संतोष सुर्यवंशी,डाॅ.जयशंकर विभुते,डाॅ.प्रशांत शिंदे,मेजर घाडगे, सुभेदार ,लक्ष्मण घोगरे माजी प्राचार्य गोरे सर व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार दैनिक तुफान क्रांती चे गणेश कांबळे यांचे वतीने सर्व कोव्हीड योध्यांचा व शिक्षकांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य कोकाटे सी.टी.उपप्राचार्य लावंड बी.आर.पर्यवेक्षक, हासे डी.व्ही.जगताप जी.जे.तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुलाणी एस.टी.यांनी तर आभार प्रदर्शन, यादव एस.आर यांनी केले.

