कालठण नं.१ येथे जिजाऊ इन्स्टिट्यूट वतीने ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा..!!
इंदापूर : प्रतिनिधी
जिजाऊ इन्स्टिट्यूट, कालठण नं.१ (ता. इंदापूर) याठिकाणी ७२ वा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छाया भोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यादरम्यान अध्यक्षा प्रा.डॉ. जयश्री गटकुळ, प्राचार्या राजश्री जगताप, प्रा. सागर उंबरे, प्रा.अर्चना शिंदे, प्रा.प्रातिक्षा शेजाळ, प्रा.ज्योती डोंगरे, विश्वाबाला गटकुळ, शिवानी गटकुळ आणि संस्थेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
प्रा. डॉ. जयश्री गटकुळ म्हणाल्या, आजच्या युवा पिढीला घडविण्याचे शिक्षक करत आहेत. शिक्षित पिढी तयार होवून समाजपरिवर्तन घडण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच देशाची क्रांती घडवून आणण्याचे कार्य गुरु -शिष्य करत असतात. गुरु म्हणून कर्तव्यदक्षता, विद्वता, नैतिकता, प्रामाणिकता ही अनमोल मूल्य शिक्षकांना जपावी लागत असल्याचे जयश्री गटकुळ म्हणाल्या.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कोविड-१९चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करुन कार्यक्रम पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हर्षदा करे आणि साक्षी करे यांनी केले.तर आभार सागर उंबरे यांनी मानले.


