shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भुयारी मार्गाला पर्याय देऊ - पी. बी. दिवाण..!!

अहमदनगर - दि. १९ जानेवारी ..!
खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील व सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली नगर मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथील भुयारी मार्गाला पर्याय उपलब्ध करून देऊ असे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग चे प्रोजेक्ट डायरेक्टर मा. पी. बी. दिवाण साहेब यांनी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व राहुरी अर्बन चे चेअरमन रामभाऊ काळे  यांचेशी बोलताना दिले. 

अहमदनगर येथे राष्ट्रीय महामार्ग चे प्रोजेक्ट डायरेक्टर मा. पी. बी. दिवाण साहेब यांची आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे यांनी अहमदनगर येथे भेट घेतली. व नगर मनमाड महामार्गावर  राहुरी फॅक्टरी येथिल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना धोकादायक अवस्थेत  रस्ता ओलांडून शाळेत जावे लागते, त्यासाठी येथे भुयारी मार्ग ची तरतूद करण्यात यावी या   प्रश्नाकडे लक्ष वेधले असता दिवाण साहेब बोलत होते. 

पुढे बोलताना दिवाण साहेब यांनी सांगितले की, भुयारी मार्गाला येणारा खर्च, उपलब्ध निधी, आणि भु-संपादनासाठी लागणारा कालावधी लक्ष्यात घेऊन खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील व सदाशिवराव लोखंडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली येथील मुलांची अडचण सोडवण्यासाठी हा महामार्ग बनविताना नक्कीच योग्य तो पर्याय उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मा. दिवाण साहेब यांनी दिले.

त्यामुळे राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील भुयारी मार्गाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विस्वास आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व रामभाऊ काळे यांनी व्यक्त केला.
close