shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घोर कलीयुगात मुलाने बापाला बदडले...!!

अर्धी जमीन वाटून का देत नाही ? म्हणून मुलाने बापाला बदडले : मुलगा व भावा विरुद्ध गुन्हा दाखल 
---------------
केज । प्रकाश मुंडे  : जिल्हा प्रतिनिधी :- मला अर्धी जमीन का वाटून देत नाही? असे म्हणून मुलाने स्वतःच्या बापाला चुलत्याच्या मदतीने गज आणि बेल्टने बदडल्याची घटना केज तालुक्यातील ढाकणवाडी येथे घडली आहे.


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील ढाकणवाडी येथील रामेश्वर हंगे यांना दोन मुले आहेत. दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ९:३० च्या दरम्यान त्यांचा मुलगा किशोर व त्यांचा भाऊ नवनाथ हंगे हे दोघे चुलते-पुतणे घरी आले. किशोर हा त्याचे वडील रामेश्वर हंगे यास म्हणाला तुमच्या नावावरील असलेली अर्धी जमीन ही माझ्या नावावर का करीत नाहीत? तेव्हा ते म्हणाले की, अर्धी जमीन मी तुझ्या एकट्याच्या नावे कशी काय करू? असे म्हणताच किशोर हंगे याने कमरेच्या बेल्टने मारहाण सुरू केली. तसेच नवनाथ हंगे याने लोखंडी गज डोक्यात मारून डोके फोडले. तसेच त्यांची पत्नी यांना पण मारहाण केली. या प्रकरणी रामेश्वर हंगे यांच्या तक्रारीवरून केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ३७/२०२१ भा. दं. वि. ३२३, ३२४, ५०४, ५०६ व ३४ नुसार मुलगा किशोर हंगे आणि भाऊ नवनाथ हंगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कलीयुगात कधी काय होईल सांगता येत नाही हेच खरे. ह्या प्रकाराची सर्व केज तालुक्यात चवीने चर्चा होत आहे.
close