हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव शहरातील शंकरनगर मध्ये शिव सरपंच सेवासंघ जिल्हाध्यक्ष पंडीत तिडके यांच्या निवासस्थानी हिंदुह्रदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दि.२३ जानेवारी शनिवार रोजी साजरी करण्यात आली.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त सेनगांव शहरात शिव सरपंच सेवासंघ कडुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिव सरपंच सेवासंघ चे हिंगोली जिल्हाध्यक्ष पंडीत अण्णा तिडके यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी हिंगोली जिल्हाध्यक्ष पंडीत तिडके,महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार तोष्णीवाल,शिव सरपंच सेवासंघ हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख तथा पत्रकार विश्वनाथ देशमुख,जामदयाचे सरपंच शेकुराव हगवणे,शिवणी(कुटे)चे सरपंच रमेश कुटे,विनायक पोले,नारायण देशमुख,पांडुरंग तिडके आदीसह उपस्थित होते.

