वडापुरी येथे रविकिरण फुटवेअर या दुकानाचे उद्घाटन संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी:( २४ जाने.२१)वडापुरी येथे श्री नाथांच्या पावन भूमीत आज वडापुरी चौकामध्ये रविकिरण फुटवेअर या दुकानाचे नवीन ठिकाणी नामांकित चप्पल, बूट, सैंडल मिळणाऱ्या या दुकानाची आज सुनील मिसाळ सर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न झाले. यावेळी दादा जगताप दयानंद चंदनशिवे हरिभाऊ माने सुनील कोकरे माणिक मिसाळ रंजीत चंदनशिवे गणी मुलानी समीर मदने प्रकाश करगळ महेश शेलार शेरखान शेख दत्तात्रेय जाधव भारत शिंदे हे तानाजी पिंगळे एकनाथ जगताप स्वप्निल तोबरे आप्पा देवकर इत्यादी व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते
यावेळी रविकिरण फुटवेअर वडापुरीचे प्रो. प्रा. नानासो पासगे यांनी नोकरीपेक्षा उद्योग व्यवसाय यामधूनच माणसांची खरी प्रगती होते तसेच वडापुरी पंचक्रोशीतील ग्राहकांना योग्य दरात सर्व कंपन्यांची वेगवेगळी फुटवेअर मिळावेत म्हणून या दुकानाची याठिकाणी सुरुवात केली असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले

