shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिव सरपंच सेवासंघ हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदी रमेशराव कुटे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार..!!



हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२३,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील शिवणी(बु)येथील सामाजिक कार्यकर्ते सरपंच रमेशराव कुटे यांची शिव सरपंच सेवासंघाच्या हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष पंडीत तिडके यांच्या निवासस्थानी दि.२३ जानेवारी शनिवार रोजी सत्कार करण्यात आला.


शिव सरपंच सेवासंघ संस्थापक अध्यक्ष मा.श्री.लक्ष्मणसाहेब विठ्ठल सरवदे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा जयश्रीताई दिपक शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्हाध्यक्ष पंडीत तिडके यांनी रमेशराव कुटे यांची शिव सरपंच सेवासंघाच्या हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.रमेशराव कुटे यांची हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल पंडीत तिडके यांच्या निवासस्थानी दि.२३ जानेवारी शनिवार रोजी सत्कार करण्यात आला.यावेळी शिव सरपंच सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष पंडीत तिडके,महाराष्ट्र पत्रकार संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिरीषकुमार तोष्णीवाल,पत्रकार तथा शिव सरपंच सेवासंघाचे हिंगोली जिल्हा प्रसिध्दीप्रमुख विश्वनाथ देशमुख,जामदयाचे सरपंच शेकुराव हगवणे,विनायक पोले,पांडुरंग तिडके आदीसह उपस्थित होते.
close