shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर नगरपरिषद व सर्व बँकेच्या वतीने पथविक्रेते व फेरीवाले यांना पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी लाभासाठी कॅम्पचे आयोजन ..!!

इंदापूर नगरपरिषद व सर्व बँकेच्या वतीने पथविक्रेते व फेरीवाले यांना पंतप्रधान आत्मनिर्भर स्वनिधी  लाभासाठी कॅम्पचे आयोजन ..!!
इंदापूर प्रतिनिधी: (१७ जाने.२१)इंदापूर नगरपरिषद इंदापूर आणि सर्व बँका यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान पतविक्रेता आत्मनिर्भर निधी पंतप्रधान स्व निधी "मे भी डिजिटल "मोहीम अंतर्गत पथ विक्रेते यांना आर्थिक साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम ( दि. १७.जाने)  इंदापूर नगरपरिषदेच्या समोर रविवार या आठवडा बाजारा निमित्त सर्व व पथविक्रेते व फेरीवाले यांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यानिमित्ताने या कॅम्पचेआयोजन करण्यात आले .
यावेळी या कॅम्पमध्ये नगरपरिषद इंदापूर, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कार्पोरेशन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एच एफ डी सी सी बँक, आय डी बी आय बँक, जनता सहकारी बँक ,महाराष्ट्र ग्रामीण बँक, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, आय सी आय सी बँक यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित केले होते.
यावेळी नगरपरिषद इंदापूर चे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी सदर नागरिकांना आवाहन  केले की,पंतप्रधान कार्यालयाकडून पथ विक्रेते आहेत.  छोटे छोटे व्यवसायीक यांना लॉकडाउनच्या काळामध्ये धंदे चालू नसल्याने आर्थिक टंचाईला त्यांना सामना करावा लागत होता. पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे ही एक चांगली व्यावसायिकांसाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेली संधी आहे. याच्यामध्ये ज्या बँकेचे खाते आहेत. त्यांना अल्प व्याजदरांमध्ये दहा हजार रुपयाचे कर्ज मिळणार आहे. त्यांनी त्याचे समान हप्त्यांमध्ये वर्षभरामध्ये परतफेड करायचे आहे. एकदम चांगली संधी आहे हे छोट्या लोकांचा याच्यामध्ये व्यवसाय सुरू होऊ शकतो. नगर परिषद व सर्व बँका याठिकाणी आज कॅम्प लावून बसले आहेत .सगळ्यांनाच त्यांच्या दारात सर्विस दिल्यासारखे देत आहोत. आठवडी बाजारासाठी आलेले असतात त्यांना बँकेसाठी हेलपाटे मारण्याची त्रास होऊ नये म्हणून हा कॅम्प आयोजित करण्यात आले आहे. नगरपरिषदेच्या वतीने सगळ्या छोट्या विक्रेत्यांना विनंती आहे .आपण या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले व्यवसाय व्यवस्थित चालवावे असे माझे आव्हान आहे. तसेच ते पुढे म्हणाले की नगरपालिकेचे कर्मचारी सदर योजनेसंदर्भात प्रत्यक्ष जागेवर जाऊन आव्हान करून या योजनेची संधी घेण्यासाठी सांगत आहे. पथ विक्रेत्यांना नगरपरिषदेने एक वर्षापूर्वी सर्वे केला आहे. हे बाहेरचे असतील किंवा स्थानिक शहरांमध्ये व्यवसाय करतात असे जे कायमस्वरूपी चे व्यवसाय करतात या लोकांना हा लाभ दिला जातो. या योजनेला नागरिकाकडून सहकार्य मिळत नाही. म्हणून नागरिकांना सहकार्य मिळावे. त्यांना बँका कर्ज देणार आहेत. बँकांकडे हे एप्लीकेशन येत नाहीत म्हणून हा कॅम्प लावला आहे. बँक मॅनेजर. बँक कर्मचारी उपस्थित आहेत. बँकेकडून सहकार्य मिळत आहे. तरी या  योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी यावेळी  आव्हान केले . 
यावेळी सुभाष ओहोळ सहाय्यक प्रकल्पाधिकारी, योगिता सरगर समुदाय संघटक, सुजय मखरे  नोडल ऑफिसर व बाजारातील नागरिक उपस्थित होते.
close