shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषीमुल्य आयोगास स्वायत्तता द्या..! शेतकरी संरक्षण कायदा लागू करा-अशोक सब्बन ..!


राळेगणसिद्धी (प्रतिनिधी) :
भारतीय जनसंसद,
पिपल्स हेल्पलाईन,
मेरे देश में मेरा अपना घर या संघटनेचे कार्यकर्ते मा. अण्णां हजारे यांच्या होणाऱ्या सत्याग्रह आंदोलनास पाठींबा दर्शविण्यासाठी भेट घेवून चर्चा केली.

शेतकरी संरक्षण कायद्यासाठी कोरोना नंतरचे नवीन वर्ष किसान क्रांती वर्ष म्हणून संघर्षाची घोषणा.

गावापासून बांधापर्यंत कायद्याला पाठिंबा देण्यासाठी किसान सत्याग्रहींची नोंद होणार..!!
शेतकर्‍यांच्या उत्पादित मालाला उत्पादच्या खर्चावर आधारीत दिडपट आधारभूत मुल्य मिळणे व कृषीमुल्य आयोगास स्वायत्तता  मिळण्याच्या प्रश्‍नांवर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला असताना, पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी (ता. पारनेर) येथे अण्णांची भेट घेतली. तर देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्या व त्यांचा सर्वांगीन विकास होऊन सन्मानाने जगता यावे यासाठी कॄषी मुल्य आयोगाने दिडपटमुल्याच्या शिफारशीचा समावेश करुन देशात शेतकरी संरक्षण कायदा लागू होण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, अर्शद शेख, विलास वाघमारे, पांडूरंग सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मा.आण्णा हजारे यांचेशी चर्चा करताना संघटना पदाधिकारी..

केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेल्या तीन नवीन कृषी कायद्या विरोधात देशातील शेतकर्‍यांमध्ये चीड व असंतोष पसरला आहे. देशातील शेतकर्‍यांना शेतकरी संरक्षण कायद्याने न्याय मिळू शकणार आहे. यासाठी मा. अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली देशातील शेतकर्‍यांचे आंदोलन होणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेती व्यवसाय डबघाईला आला आहे. शेतकर्‍यांकडे सरकारचे पुर्णत: दुर्लक्ष आहे. त्याच बरोबर नैसार्गिक संकटात शेतकरी होरपळत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी केंद्र स्थानी ठेऊन शेतकरी संरक्षण कायदा असतित्वात येण्यासाठी संघटनेच्या वतीने गावापासून बांधापर्यंत या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी किसान सत्याग्रहींची नोंद केली  जाणार आहे. 

याचा संघटनेच्या वतीने प्रचार प्रसार केला जाणार आहे. हा कायदा देशात आणण्यासाठी मा.अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली सुरु होणार्‍या आंदोलनात उतरण्याचे संघटनेने जाहीर केले. तर वेळप्रसंगी सर्व शेतकरी जेलभरो आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील देण्यात आला.
close