shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नामदार चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा -२०२१


पाचव्या दिवशी टाकळी ढोकेश्वर संघ उपउपांत्यपूर्व फेरीत

श्रीरामपूर ( दत्तनगर ) : - येथील इंद्रप्रस्थ क्रिडांगणावर सुरू असलेल्या स्व. आमदार जयंतराव ससाणे यांच्या स्मरणार्थ नामदार चषक राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पाचव्या दिवशी अतिशय चुरशीचे सामने झाले. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर संघाने सुपर आठ संघात प्रवेश केला.

आज सकाळी दिवसाच्या पहिल्या सामन्यात टाकळी ढोकेश्वर संघाने जय मल्हार खोपडी संघावर विजय मिळविला. या सामन्यात ओंकार उदावंत सामनावीर ठरला.त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात टायटन सुराळे संघाने खंडेराम वाकडी संघाला पराभूत केले. या सामन्यात शाहरूख शेख सामनावीर ठरला.

आजच्या दिवसातल्या तिसऱ्या सामन्यात डी.सी.सी. दत्तनगर संघाने कारेगांव संघावर बाजी मारली. या सामन्यात सर्जील बागवान सामनावीर ठरला.चौथा सामना डी.सी.सी दत्तनगर व टाकळी ढोकेश्वर अशी लढत झाली. त्यामध्ये टाकळी ढोकेश्वर संघ सरस ठरला.या सामन्यात ओंकार उदावंत सामनावीर ठरला.

शेवटच्या सामन्यात टायटन वैजापूर व टाकळी ढोकेश्वर ही अतिशय रोमहर्षक लढत झाली. यामध्ये टाकळी ढोकेश्वर संघाने विजय मिळवून सुपर आठ मध्ये प्रवेश केला. या सामन्यात अमोल गागरे सामनावीर ठरला.आज या सामन्यांमध्ये  डॉ. दत्ता विघावे, ऋषिकेश विघावे, विजय शिंदे, दिपक पिळगांवकर यांनी पंच म्हणून तर कृष्णा पोखरकर सर, स्वप्नील गाजरे, मयूर गार्डी, दिपक मोरे यांनी  पुणे क्रिकेट डॉट इन या यु ट्यूब वर सामन्याचे थेट प्रक्षेपण केले. तर रविंद्र जाधव व शाहरूख पठाण यांनी समालोचन केले.

स्पर्धेचे मुख्य संयोजक नानासाहेब शिंदे, पी.एस निकम सर, आरपीआयचे भिमराज बागुल, शरद भणगे, प्रदिप गायकवाड, अरूण बागुल, कलीम पठाण यांच्या हस्ते सामनावीरांना सन्मानीत करण्यात आले.
close