चाकाटी ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचे बहुमत..!!
इंदापूर प्रतिनिधी: (दि.२० जाने.२१)चाकाटी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने यश संपादन करत ७ पैकी ५ जागा जिंकत विजय प्राप्त केला.
चाकाटी ग्रामपंचायतवर मागील पंचवार्षिक मध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांना धक्का देत बहुमत प्राप्त करून ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत भैरवनाथ पॅनलला ५ उमेदवार विजयी करण्यात यश मिळाले असून या उमेदवाराचे विजय हा सर्वसामान्य जनतेचा विजय असल्याचे मत नवनाथ रुपनवर यांनी केले. तर जय भवानी ग्रामविकास पॅनल यांना २ जागेवरती उमेदवार विजय मिळवण्यात यश आले आहे.
भैरवनाथ पॅनलच्या विजयी उमेदवारांची नावे: घोडके समाधान जनार्दन (अनुसूचित जाती), रुपनवर मनीषा संजय (नागरीकांचा मागासवर्ग स्री), मारकड हर्षाली साहेबराव (सर्वसाधारण स्त्री) रुपनवर संजय बबन (सर्वसाधारण), तनपुरे शुभांगी अतुल (सर्वसाधारण स्त्री). तर जय भवानी ग्राम विकास पॅनलचे विजयीउमेदवार ची नावे: मारकड आबा हनुमंत (नागरीकांचा मागास वर्ग), जाधव पारूबाई हनुमंत (सर्वसाधारण स्त्री)

