shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले जेरबंद..!!

हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख)
दि.१९,आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपये किंमत असलेल्या दुर्मिळ प्रजातीच्या मांडूळाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना हिंगोली पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन जिंवत मांडूळ जप्त करण्यात आले आहेत. या मांडूळ जातीच्या सापाची अंदाजे किंमत १५ लाख रुपये एवढी असल्याचे बोलले जात आहे.


पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत धक्कादायक बाब समोर आली आहे.की सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर गावातील व हिंगोली तालुक्यातील सरकळी या गावातील सतीश कांबळे व दत्तराव साठे हे मांडूळ प्रजातीचे जिवंत साप बाळगून त्याची आंतरराष्ट्रीय चोरटी तस्करी करून त्याची विक्री करण्यासाठी बाळगून आहेत. त्यानंतर पथकाने हिंगोली येथील सर्पमित्र विश्वंभर पटवेकर यांना सोबत घेऊन सेनगाव तालुक्यातील देऊळगाव जहागीर येथे जाऊन सतीश महादू कांबळे (वय २३) याच्या घराची तपासणी केली.असता एका प्लास्टिकच्या बादलीत ठेवलेला काळसर रंगाचा मांडूळ प्रजातीचा २ किलो ग्रॅम वजनाचा जिवंत साप आढळून आला.
या अडीच फूट असलेल्या सापाची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच दुसऱ्या कार्यवाहीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील दत्तराव साठे ( वय ४५) याच्या घराची तपासणी केली असता यावेळी 1 किलो ग्रॅम वजनाचा एक जिवंत मांडूळ जातीचा साप आढळून आला. या सापाची अंदाजे ५ लाख रुपये किंमत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोन्ही आरोपींनी राहत्या घरामध्ये वाइल्ड लाइफ वॉर्डन यांच्या परवानगीविना मांडूळ प्रजातीचे दोन साप अंदाजे १५ लाख रुपये किमतीचे चोरटी विक्री/तस्करी करण्याच्या उद्देशाने ठेवले होते. दोन्ही आरोपींना मांडूळ प्रजातीच्या दोन्ही सापासह विभागीय वनाधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, शिवसांब घेवारे, बालाजी बोके, शंकर जाधव, विलास सोनवणे, राजूसिंह ठाकुर, शंकर ठोंबरे, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
close